पिंगुळी - एक आठवण

पिंगुळी ....   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील  कुडाळ तालुक्यातील एक छोटस खेडेगाव.  जिथे  मी माझ्या बालपणी राहिले.  माझा जन्म दादर येथील डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर  यांच्या  दवाखन्यात झाला.  माझे  आईबाबा  दोघे ही नौकरी करणारे.  मग माझ्या आईच्या  आईवडिलांनी  संमती दिली   म्हणून  माझ्या जन्माच्या पहिल्याच महिन्यात माझी रवानगी माझ्या आजी आजोबांच्या  पिंगुळी  येथील घरी झाली.  पुढे माझ्या वयाची जवळ जवळ आठ वर्ष  मी त्यांच्या सहवासात असल्याने  मी   त्यांना   आई आबा  अशी हाक मारत असे.  कारण माझे आई वडील मला भेटायला महिन्यात  एक फेरी मुंबईहून पिंगुळीला  मारीत.   मी  माझ्या आईला मुंबईची आई अशी  हाक मारत  असे.

==> ईश्वरी  चिंतामणी ठाकूर
==> आईचे माहेर पिंगुळी



Comments